उपक्रम
“सृष्टिमार्ग संस्था” ही पर्यावरण संवर्धनावर गेले नऊ वर्ष कार्यकरीत आहे. आम्ही आमचे कार्य ४ विभागात विभागले आहे.
- १. वृक्षारोपण, संरक्षण व संवर्धन करणे.
- २. पर्यावरणा विषयी प्रबोधन करणे
- ३. अपारंपारीक उर्जास्त्रोत, जसे सौर उर्जा, बायोगॅस यांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- ४. जैविक कचरा व ई-कचरा व्यवस्थापन करणे, यांत घरातल्या घरांत स्वयंपाक घरातील भाजीपाल्यांचा ओला कचऱ्या पासून खत बनविण्यासाठी आग्रही असणे आणि ईवेस्ट म्हणजे मोबाईल, कंम्प्युटर व सर्व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे संकलन करून त्याला योग्य संस्थेकडे पुनर्वापरासाठी सोपविणे.
जमीनीवर जन्म घेऊन या सृष्टिचे वायु, जल, जमीन, प्रकाश व आकाश मोफत वापरत असल्याने माणसाचे जीवन क्षणाक्षणाला सृष्टिचे ऋणी होत आहे. या विचाराने यातून मुक्तीसाठी पर्यावरणाचे काम करणे आपले कर्तव्य आहे व ते केलेच पाहिजे, हा विचार संस्थेचा आहे. यामुळे आपण आपल्या जन्माच्या ऋणातून मुक्त झाले पाहिजे असा संस्थेचा जनतेला आग्रह आहे. सृष्टिमार्ग संस्था वर्षातून नियमीतपणे उपक्रम अनिवार्यपणे राबवते.