गुरु पौर्णिमा
गुरुपौर्णिमा उत्सव दि. २३ जुलै २०१७ रोजी संध्या. ५ ते ८ या वेळेत कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ २५ प्राधिकरण, पुणे - ४४ येथे संपन्न झाला. सभेत प्रमुख पाहुणे श्री विलासराव गावडे, गावडे कन्स्ट्रक्शन, विवेक नगर आकुर्डी हे होते. प्रथम प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन व महर्षी व्यासांना पुष्पांजली वाहिली. श्री अरुण पुराणिक यांनी प्रास्ताविक भाषण केले. श्री अरुण सावंत, मुंबई हे पाहुणे म्हणून त्यांनी संस्था व अध्यक्ष यांच्याविषयी आपले विचार मांडले.
सृष्टीमार्ग संस्थेच्या संस्कार वर्गातील मुलांनी, व भगवतगीता अध्याय बारावा म्हटला. श्री गावडे साहेबांनी आपण पर्यावरण व निसर्गाचेच भाग आहोत हे प्रभावी रीतीने विचार व्यक्त केले. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निसर्गवानी या वार्षिक अंकाचे व सृष्टिमार्ग या हिंदीतील डी.व्ही.डी. चे उदघाटन केले. शुभांगी महाशब्दे यांनी अंक व डी.व्ही.डी बदद्ल माहिती सांगितली, नंतर पुण्यातील श्रेष्ठ नागरिकांची एक संस्था 'कुसुमाग्रज कट्टा' यांनी 'वसुंधरेची पखरण ' हि नाटीका सादर केली. कुमार सौमित्र महाशब्दे या संस्था सभासदाच्या मुलाने इसरो प्रोजेक्ट प्रदर्शनात भाग घेतला होता. त्याने प्रोजेक्टच्या स्लाईड दाखवून अवकाशयानांबद्दल माहिती सांगितली. त्याला संस्थेतर्फे प्रमुख पाहुणे श्री गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्रीमती शोभा पांडे यांनी सृष्टिमार्ग या पुस्तकातील कथा व तत्वज्ञान, सोप्या भाषेत उलगडून सांगितले. कु. श्रावणी सरोदे या सभासदांच्या मुलीने सुंदर नृत्य सादर केले. डॉ. शरयू पुराणकर यांनी आभार प्रदर्शन केले सर्वांना भोजन करून जाण्यास विनंती केली. श्री दत्तात्रय जोशी यांनी सूत्र संचालन केले. या कार्यक्रमास श्री योगेश महाशब्दे, सौ. कल्याणी कुलकर्णी व तुषार पुरणकर, सौ. स्मृती पुराणिक व वनिता लढ्ढा यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. ेले.