• 9049686350

संस्थेचे ध्येय व उद्देश

सामाजिक :

  • गणेशोत्सव, नवरात्र, तिळसंक्रांत, शिवरात्र आणि गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे करणे आणि त्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासंबंध प्रबोधन करणे.
  • निसर्गाचे अध्यात्म कला व संस्कृती यांना प्रोत्साहन देणारे विविध कार्यक्रम आयोजित करणे.
  • सौरउर्जा, बायोगॅस इत्यादी अपरंपारिक उर्जा स्त्रोतांच्या वापराला प्रोत्साहन देणे.
  • प्रदूषणरहित / खनिजतेल रहित यंत्र सामुग्रीच्या वापरास / निर्मितीस प्रोत्साहन देणे.

शैक्षणिक :

  • निसर्ग, पर्यावरण आणि आधुनिक जीवन शैली यात समतोल साधण्यास शिकविणाऱ्या सृष्टीमार्गाच्या अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार - प्रसार करणे.
  • महाराष्ट्रात प्रदुषण नियंत्रण मंडळ, वनविभाग, पर्यावरण विभाग इ. संस्था पर्यावरणासाठी राबवित असलेल्या उक्रमात व कार्यक्रमाचे राज्यातील विविध शाळा, महाविद्यालये यामध्ये प्रचार - प्रसार करणे.
  • जुने नावाजलेले व नवोदित लेखक तसेच कवी, यांच्याकडून पर्यावरण समतोल, सृष्टीमार्ग अध्यात्म आणि समाजसेवक लिखाण लिहून घेणे. त्या लेखनाचे भाषांतर करणे पत्रपत्रिका, पुस्तक रुपात प्रकाशन करणे.

पर्यावरण :

  • वृक्ष संवर्धन कार्यक्रम सुरु करणे.

संस्थेविषयी :

"सृष्टीमार्ग संस्था" SRUSHTIMARG SANSTHA आकुर्डी पुणे ४११०३५ ही संस्था नोंदणी अधिनियम १८६० / सन १८६० च्या अधिनियम २१ अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी क्र. महा.२७५/२०१४/पुणे.
"सृष्टीमार्ग संस्था" SRUSHTIMARG SANSTHA आकुर्डी पुणे ४११०३५ ही संस्था सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० (सन १९५० च्या मुंबई अधिनियम क्रमांक २९) या अनव्ये नोंदणीकृत आहे. विश्वस्थ व्यवस्था नोंदणी क्रमांक F४५९५८/P दि ३०/११/२०१५

सभासदत्व / मेम्बरशीप

सृष्टीमार्ग संस्थेचे सक्रीय सभासद होण्याकरता संपर्क करा.

आपण हे करू शकतो.
  • संस्थेचे सक्रीय सभासद होऊ शकता आजीव सभासद शुल्क १०००/- व वार्षिक शुल्क १७०/- रु आहे.
  • संस्थेची पुस्तके वाचू शकता किंवा इंटरनेटव्दारे संस्थेशी जुडू शकता.
  • संस्थेची शिबीर व उत्सवात भाग घेऊ शकता.
  • संस्थेला आर्थिक सहयोग देऊ शकता. आपण देणगी चेकद्वारे अथवा डी. डी. व्दारे "सृष्टीमार्ग संस्था" या नावे काढावी.

वृक्ष संवर्धन

स्वच्छता अभियान

जल संवर्धन

साक्षरता अभियान